Marathi Shayari
Marathi Shayari
दोन्ही हात पसरुन मांगतोय देवा एक वर दे, संकटांशी या लढण्याचे हातात तेवढे बळ दे.
किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत, पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.
वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली. तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या, पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.
काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात, नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.
भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला, येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून, मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन, आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.
तुझी सोबत तुझी संगत, आयुष्य भर असावी नाही विसरणार मैत्री तुझी, तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.
तुझी आणि माझी मैत्री अशी आशावी, काटा तुला लागला तर कल माला यावी.
प्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू ? ते फक्त म्हणते कि माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू.
प्रेम कधी नाही विचारत कि कुठून आहेस तू ते फक्त म्हणते कि माझ्याच हृदयात राहतेस तू.
मी तिला प्रेम केले आशिक समजुन, जरा नीट ऐकामी तिला प्रेम केले आशिक समजुन, ती उतरून गेली कोल्हापुरलाच,नाशिक समजुन.
कोसळनारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतोय.
आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी, वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता, त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता.
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल, मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल, प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम, करतो तिच्या शेजारी बसने आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव, देणारे माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला.
Checkout :
0 comments:
Post a Comment